Monday, September 28, 2026
Homeमंबईराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात कोकण प्रदेश...

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात कोकण प्रदेश कार्यकारणी बैठक व पत्रकार परिषद संपन्न..

मुकनायक मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे

ठाणे (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे कोकण प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली..

ह्या बैठकीचे व पत्रकार परिषदेचे आयोजन कोकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठलदादा चौधरी यांच्या वतीने करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने वेगाने सुरू आहे दररोज महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील अनेक नामावंत व्यक्ती विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे. राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षाने नेहमीच गोरगरीब/ दलित /बौद्ध/मागासवर्गीय/ अल्पसंख्यांक /आदिवासी/ ओबीसी/ भटके विमुक्त समूहाच्या जीवन मरणाच्या प्रश्नांकडे नेहमीच डोळे झाक केलेली दिसते. स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही या घटकांची कोणत्याही क्षेत्रात सर्वांगीण प्रगती नाही अजूनही त्यांना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करावा लागत आहे म्हणून राज्यातील आता हे सर्व समाज घटक प्रस्थापित पक्षांना कंटाळले असून ते पर्यायच शोधत आहे त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असेही कटारे यांनी शेवटी सांगितले.

“गाव तिथे शाखा” निर्माण करणार व मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा व कोकण प्रदेश मध्ये पक्षामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्याचे कार्य कोकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रामुख्याने या बैठकीस व पत्रकार परिषदेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिनभाऊ नांगरे, मुंबई प्रदेश नेते अशोकराव भोगले, महाराष्ट्र राज्य युवा संपर्क प्रमुख संतोष राजगुरू, येवला युवा नेते तुषार वाघ, युवा नेते बबन वाघ, युवा नेते प्रशांत कटारे प्रदेश नेते, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख राजभाऊ मोकळ, नाशिक जिल्हा उप-अध्यक्ष राजू जाधव, युवा नेतेसागर वाघ , येवला तालुका संघटक चेतन वाघ, येवला तालुका सरचिटणीस विजय वाघ, मराठवाडा नेते वाल्मिक पठारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईनाथ खरात ठाणे शहर/जिल्हा युवा अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्षा – आरोग्य विभाग रंजना भांगे, दिवा शहर अध्यक्ष रमेश तुपे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments