Thursday, June 11, 2026
HomeमंबईChhatrapati Shivaji Maharaj The Eternal Guardian of Honor and Swarajya

Chhatrapati Shivaji Maharaj The Eternal Guardian of Honor and Swarajya

Mookanay Mumbai
Avanti Khanvilkar

The word ‘Chhatrapati’ means “the one who protects.’. Its remarkable how this single word evokes the drama of history itself. One extraordinary leader entitled Chhatrapati rose to ignite the spirit of a land sheeted with terror. That leader was none other than Chhatrapati Shivaji Maharaj.
He built an empire from nothing, and that too in the most challenging circumstances. The name Shivaji itself stands for respect and dignity. His achievements are far too vast to be captured on a single page, just as the love and admiration he has received over the years cannot truly be measured.

Avanti Khanvilkar


Maharaj was a brilliant strategist who believed that intelligence is a far greater weapon than mere physical strength. He led numerous wars and battles of which the battle techniques are still taught in military institutions in Europe.
Even today, his legacy inspires generations to uphold dignity, resilience, and patriotism, making him not just a historical icon but a timeless symbol of leadership.

Avanti Khanvilkar
Mookanay Mumbai

‘छत्रपती’ या शब्दाचा अर्थ “संरक्षण करणारा” असा होतो. एका शब्दात इतिहासाचा संपूर्ण थरार दडलेला आहे, ही गोष्ट खरोखरच विलक्षण आहे. भयाच्या सावटाखाली दबलेल्या भूमीमध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवणारा एक अद्वितीय नेता ‘छत्रपती’ या पदाला भूषवून उभा राहिला. तो नेता म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, शून्यातून स्वराज्य उभे करण्याचे अद्भुत कार्य महाराजांनी केले. ‘शिवाजी’ हे नावच सन्मान आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे. त्यांची कर्तृत्वगाथा एवढी विशाल आहे की ती एका पानात मांडणे अशक्य आहे, आणि जनतेने त्यांच्या प्रति व्यक्त केलेले प्रेम व आदर मोजमापाच्या पलीकडे आहे.
महाराज अत्यंत कुशाग्र आणि दूरदर्शी रणनीतीकार होते. केवळ शारीरिक ताकदीपेक्षा बुद्धी आणि चातुर्य हेच खरे सामर्थ्य आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी अनेक युद्धे लढली आणि त्यांच्या युद्धतंत्रांचा अभ्यास आजही युरोपमधील लष्करी शिक्षणसंस्थांमध्ये केला जातो.
आजही त्यांचा वारसा पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देत आहे. स्वाभिमान, चिकाटी आणि देशभक्ती यांचे मूल्य जपण्याची प्रेरणा देणारे ते केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून एक अजरामर नेतृत्वाचे प्रतीक आहेत.

अवंती खानविलकर
मुंबई पनवेल

- Advertisment -

Most Popular

Recent Comments