Monday, September 28, 2026
Homeकोल्हापूरगडहिंग्लज येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिर संपन्न

गडहिंग्लज येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिर संपन्न

मुकनायक कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे,कोल्हापूर, दि.26 : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. 25 सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे शिकाऊ अनुज्ञप्ती संदर्भातील नियमित शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित नियम व तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या शिबिराचा एकूण 103 नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments