मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड:१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला व तो विकसित कसा होईल यासाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिले त्यामध्ये डॉ.बाबासाहेब अग्रणी होते .त्यांनी भाक्रा नांगल, हिराकुड दामोदर व्हॅली सारखी अनेक धरणे बांधली,त्यावर विद्युत निर्मिती केली,शेती विकासासाठी मार्गदर्शक सूचना करून शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, यासाठी प्रयत्न केले.औद्योगिक धोरण, कृषी धोरण, परराष्ट्रीय धोरण, रोजगारासाठी रोजगार विनिमय केंद्र,कामगार कायदे, स्रीयांसाठी हिंदू कोड बिल मांडले, आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे संविधान लिहून सर्व जाती धर्माच्या जनतेला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय दिला, आणि भारताला बलशाली बनविले असे विचार यावेळी प्रा.डॉ.भिमराव मोरे यांनी मांडले.
बुध्दिस्ट नालंदा बहुद्देशीय प्रतिष्ठान नालंदानगर यांचे विद्यमाने २०२६ या वर्षावासातील सहावा कार्यक्रम आयु.शैलेश कदम, कस्तुरी प्राइड, सावंतनगर यांच्या निवासस्थानी घेण्यात आला.समुचित विषयावर आयु.अरुण ओहोळ, माजी.पोलीस अधीक्षक, बाळकृष्ण काळबांडे माजी मुख्याध्यापक,व कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. वाय.जगताप, माजी शिक्षण अधिकारी यांनी आपले विचार मांडले.
यावेळी सामुदायिक धम्मवंदना घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी निलेश कदम,दिलीप आढाव, सैदप्पा गायकवाड,के.के.खंडीझोड,गौतम बेलखेडे, पी. एम. कापुरे,विश्वजित इंगळे,नारायण गायकवाड, श्रुती रणशृंगारे,गौरी आरवडे,निना जोसेफ, निधी माहिती निधि बाहेती ,प्रियंका रणशृंगारे,संघमित्रा कदम,नंदकुमार जाधव,शाम रणशृंगारे, निखिल कदम इत्यादी उपासक उपासिका हजर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन गोरख घोडके यांनी केले, तर आभार शाम रणशृंगारे यांनी मानले.

