दौंड भारतीय बौद्ध महासभा यांची मनुवादी लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीमनुवाद हा थांबणार कधी…?
मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड – आपला देश आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना ज्या जागेवर सभा घेतलेल्या त्यावर त्या जागेवर शुद्धीकरण करून घेणे अशा मानसिकता दाखवणाऱ्या शुद्धीकरणाच्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत.
दिल्ली येथील राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांची ज्या मैदानाच्या जागेवर सभा घेतलेल्या ठिकाणी सभा झाल्या नंतर काही मनुवादी लोकांनी सभा घेतलेल्या जागेचे मैदानाचे शुध्दीकरण केलेची बाब दिसून आले. मनुवाद हा थांबणार कधी.. दौंड भारतीय बौद्ध महासभा यांच्या कडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला दौंड भारतीय बौद्ध महासभा निवेदनाच्या माध्यमातून सभेचे मैदान शुध्दीकरण कृत्य केलेल्या सदरच्या मनुवादी वृत्तीच्या लोकांवर अनुसूचित जाती / जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी दौंड भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे , सरचिटणीस संजय सोनवणे, कोषाध्यक्ष शिवराम लोंढे, यश पाळेकर, विजय बगाडे, शुभम गायकवाड, शुभम गायकवाड, दिपक सोनवणे,संदीप कांबळे, ज्योती मोकळ,स्नेहल मुन, सुरेश अहिरे, दिलीप पगारे, पी. एम. कापुरे , दिगंबर पवार, भगवान शिंदे, प्रकाश सोनवणे,असंख्य कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

