Monday, September 28, 2026
Homeमहाराष्ट्रउच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करंजीच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करंजीच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

वसमत (प्रतिनिधी) : करंजी येथील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गावाच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : इयत्ता चौथी तुकाराम इंगोले, स्वराज सरोदे, प्रतीक्षा सरोदे,अनन्या डोहरे.इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती) माधव सोनटक्के.इयत्ता सातवी गंगासागर सोनटक्के, वेदिका डोहरे कार्तिक होळपादे,वैष्णवी मलांडे,कार्तिकी इंगोलेइयत्ता आठवी (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती)- कृष्णा इंगोलेया सर्व विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका चोपडे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील थोरात, लोहारेकर मॅडम, कोल्हे सर, पारवे सर, प्रियंका मॅडम, सरिता मॅडम तसेच आळणे मिलिंद समतादूत सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशप्राप्ती एज्युकेशन, करंजी येथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन दिले जात असल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांची यशाची परंपरा अधिक भक्कम होत आहे. संस्थेच्या या सातत्यपूर्ण शैक्षणिक कार्याचे पालक व परिसरातूनही कौतुक होत आहे.या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळाली असून करंजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments