Monday, September 28, 2026
Homeमहाराष्ट्रलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्याच्या जयती निमीत्त अभिवादन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्याच्या जयती निमीत्त अभिवादन.

सोलापूर, प्रतिनिधी

सोलापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी याची शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर तसेच महार रेजीमेटचे सेवानिवृत्त अधीकारी व कर्मचारी याची यशसिद्धी संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भैय्या चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे नेतृत्व शिवपुत्र घटकांबळे यांनी केले. यावेळी डॉ. अंगद मुके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून देत सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. तसेच त्यांची जयंती साजरी करण्यामागील सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

या प्रसंगी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे डॉ. अंगद मुके, शांताराम वाघमारे, गौतम चंदनशिवे, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, श्रीमंत गायकवाड, गोपीनाथ कांबळे, किसन सुरवसे तसेच यशसिद्धी वेल्फेअर संघटनेचे शिवपुत्र घटकांबळे, विष्णू वाघमारे, पांडुरंग बनसोडे, बाबुराव बेलभंडारे, राहुल साबळे, मोतीराम सुरवसे, सूर्यकांत गजघाटे, लिंबाजी कांबळे, मसन्ना मनोरे व आयवळे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे खजिनदार शांताराम वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सागता करण्यात आली

- Advertisment -

Most Popular

Recent Comments