मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे
कोल्हापूर, दि. 3 : 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक आहे. याबाबत वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, HSRP बसविण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी संपुष्टात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील वाहनांनाही HSRP बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, ज्या वाहनधारकांनी HSRP बसविण्यासाठी आगाऊ शुल्क भरून अपॉइंटमेंट घेतली आहे किंवा 1 जुलै नंतरही HSRP साठी शुल्क भरल्याची वैध पावती सादर केली आहे, अशा वाहनधारकांना कारवाईतून सूट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
HSRP शिवाय वापरात असलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी दिला आहे.

