Saturday, July 11, 2026
Homeमहाराष्ट्रसामाजिक बांधिलकी जपणारे, आंबेडकरी चळवळीतील 88 व्या वर्षीही सक्रिय कार्यकर्ता आर. आर....

सामाजिक बांधिलकी जपणारे, आंबेडकरी चळवळीतील 88 व्या वर्षीही सक्रिय कार्यकर्ता आर. आर. पाटील 88 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल अभिष्टचिंतन !

मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे

.1 जुलै 2026 रोजी, मा. आर. आर. पाटील यांचा 88 वा जन्मदिन आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व व प्रवास बघितल्यास ते तरुणांनाही लाजवेल असे व प्रेरणादायी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ‘झरी’ तालुक्यातील ‘अळेगाव’ या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. दि *. 16 ऑक्टोबर 1956 रोजी, चंद्रपूर येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते बौद्ध धम्मदीक्षा ग्रहण केली* . त्यानंतर एक स्वाभिमानी, निष्ठावान अशा या कार्यकर्त्याने सामाजिक बांधिलकीने कार्य सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षाला प्रथम ” *क्रांतिपर्व* ” ही दिनदर्शिका सुरू केली आणि आजपर्यंत सुरू आहे. *औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे शिक्षण घेतले त्यावेळी सेक्रेटरी पद* त्यांनी भूषविले. त्यांनी एम. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. दिल्लीच्या *दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप* मिळाली. भीमा कोरेगाव विजयी स्तंभास मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाला एक जानेवारी *1970 साली सुरुवात केलेल्या आंबेडकरी पाच सैनिकांच्या तुकडीतील ते एक सैनिक* आहेत. पुण्यातून सुरुवात झालेल्या *बामसेफच्या स्थापनेपासून ते सदस्य* राहिले आहेत. *”आयकर अधिकारी” म्हणून पुणे,सातारा, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद येथे नोकरी केली.* यादरम्यान त्यांनी बुद्ध, फुले ,शाहू ,आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. *भारतीय बौद्ध महासभा सातारा येथे पाच वर्ष अध्यक्ष पद भूषविले*. सातारा येथे असताना त्यांनी *जिल्हा महार रेजिमेंट माजी सैनिक संघ सातारा स्थापन* केले. सातारा करंजी येथे बुद्धविहाराची 1985 साली स्थापना केली आणि बौद्ध धर्माची चळवळ गतीमान करण्यासाठी व जागृतीसाठी कार्य केले. सातारा येथे महापुरुषांच्या स्मृती व्याख्यानमालांची सुरूवात केली. ही व्याख्यानमाला गेली 25 वर्ष पेक्षाही जास्त वर्ष सुरू आहे. सातारा येथे त्यांनी 22 संघटनांना एकत्र करून 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य जयंती साजरी केली. *”क्रांतिपर्व प्रकाशना”तर्फे* त्यांनी फुले -आंबेडकरी साहित्य हे वेळोवेळी प्रकाशित केले. *आंबेडकरी चळवळीचा सुमारे दीडशे वर्षाचा दैनंदिन इतिहास सांगणारी पहिली सचित्र दिनदर्शिका* गेली *36 वर्ष सतत छापने व संपादित करणे* चालू आहे. *सन 2012 पासून पाच वर्ष नागविदर्भ असोसिएशन संस्थेचे ते अध्यक्ष होते*. या संस्थेच्या स्थापने मध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. *आज नागलोक असोसिएशन, पुणे या सामाजिक संस्थेचे ते सल्लागार आहेत* . त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल व भरभराट सुरू आहे.त्यांचे एक सुपुत्र व सून नामांकित डॉक्टर आहेत. एक सुपुत्र पुणे महानगरपालिकेमध्ये प्रोजेक्ट ऑफिसर आहे, तर कन्या छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे. एक कन्या गृहिणी आहे, आर .आर. पाटील साहेब यांना सामाजिक कार्यामध्ये पत्नी आयुष्यमती शीला यांचे मोठे योगदान लाभत आहे. त्यांना निरोगी, निर्भय, निर्मळ आयुष्य लाभो ही *हार्दिक मंगलमय शुभेच्छा* आर. आर. पाटील साहेब यांचा मोबाईल नंबर :+91 91469 65081…प्रा. रवींद्र इंगोले,पुणे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments