Friday, July 17, 2026
Homeमुंबईव्हिएतनाम–कंबोडिया आंतरराष्ट्रीय धम्म पर्यटन : इतिहास, संस्कृती आणि बौद्ध वारशाचा अविस्मरणीय प्रवास

व्हिएतनाम–कंबोडिया आंतरराष्ट्रीय धम्म पर्यटन : इतिहास, संस्कृती आणि बौद्ध वारशाचा अविस्मरणीय प्रवास

मूकनायक विशेष…..

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात यांच्या वतीने संस्थेच्या इतिहासातील पहिले आंतरराष्ट्रीय व्हिएतनाम–कंबोडिया धम्म पर्यटन २ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या पार पडले. ॲड. डॉ. एस. के. भंडारे, ॲड. डॉ. एस. एस. वानखेडे, ॲड. जितेंद्र कुमार (हरियाणा) तसेच लुंबिनी ट्रॅव्हल्सचे भीमराव खोब्रागडे (नागपूर) यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या धम्म पर्यटनाने सहभागी पर्यटकांना बौद्ध संस्कृती, इतिहास आणि जागतिक वारशाची अनोखी अनुभूती दिली.

या विशेष धम्म पर्यटनामध्ये एकूण ३९ पर्यटक सहभागी झाले होते. मुंबई, दिल्ली, हरियाणा तसेच महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि नागपूर या विविध भागांतील धम्मप्रेमींनी या यात्रेत उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या पर्यटनामध्ये १२ कुटुंबांनी एकत्रित सहभाग घेतला होता, ज्यामुळे हा प्रवास केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरला.

या धम्म पर्यटनादरम्यान सहभागी पर्यटकांनी आणि या देशांमधील बौद्ध धम्माशी निगडित अनेक ऐतिहासिक आणि विलोभनीय स्थळांना भेट दिली. कंबोडियामधील सर्वात आकर्षणाचे केंद्र ठरले ते म्हणजे . तेराव्या–चौदाव्या शतकातील हा जागतिक कीर्तीचा ऐतिहासिक बौद्ध वारसा सुमारे १६२ एकर क्षेत्रात विस्तारलेला आहे. या संकुलात प्रवेशासाठी पर्यटकांचा डिजिटल फोटो असलेले विशेष तिकीट दिले जाते, ज्याची किंमत ३७ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३,५०० रुपये आहे.अंगकोर संकुलातील वास्तुकलेचे वैभव आणि आध्यात्मिक वातावरण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. दरवर्षी मार्च महिन्यात येथील प्रमुख आणि सर्वात उंच बुद्ध विहारावर सूर्योदयाचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी जगभरातून ३५ हजारांहून अधिक पर्यटक येथे येतात. या विहाराच्या चारही दिशांना भगवान बुद्धांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. स्थापत्यकलेचा हा अद्वितीय नमुना जगभरातील बौद्ध वारशामध्ये विशेष स्थान प्राप्त करून आहे.

व्हिएतनाममध्ये सहभागी पर्यटकांनी विविध बुद्ध पॅगोडा, बुद्ध विहार, विशाल बुद्धमूर्ती तसेच प्रसिद्ध यांचे दर्शन घेतले. याशिवाय जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला , आकर्षक प्रकाशयोजनेसाठी ओळखला जाणारा आणि निसर्गसौंदर्याने नटलेला या ठिकाणांनी पर्यटकांना मंत्रमुग्ध केले.व्हिएतनामचा इतिहास हा स्वातंत्र्य, संघर्ष आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आहे. दीर्घकाळ परकीय सत्तेविरुद्ध लढा देत व्हिएतनामने स्वातंत्र्याची वाटचाल केली. स्थानिक मार्गदर्शकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनामच्या स्वातंत्र्यलढ्यातील काही नेत्यांनी छापामार युद्धतंत्र आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी यांच्या कार्यातून प्रेरणा घेतल्याचे सांगितले जाते. ही माहिती भारतीय पर्यटकांसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली.

धम्म पर्यटनादरम्यान सहभागी पर्यटकांच्या सोयीसाठी व्हिएतनाम आणि कंबोडियामधील विविध भारतीय रेस्टॉरंटमध्ये सुग्रास आणि चविष्ट भारतीय भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. निवास, प्रवास, भोजन आणि स्थानिक मार्गदर्शन यांचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे सर्व सहभागी पर्यटकांनी या संपूर्ण यात्रेचा मनःपूर्वक आनंद घेतला.

या अविस्मरणीय प्रवासाच्या समारोपावेळी सहभागी पर्यटकांनी आपापली मनोगते व्यक्त करत भारतीय बौद्ध महासभेच्या आगामी आंतरराष्ट्रीय धम्म पर्यटनांमध्ये पुन्हा सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. बौद्ध धम्माचा जागतिक वारसा, विविध देशांतील सांस्कृतिक समृद्धी आणि भारतीय बौद्ध समाजातील एकात्मतेची भावना अधिक दृढ करणारे हे धम्म पर्यटन भविष्यातील आंतरराष्ट्रीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments