पुणे, दि.26: समाजातील सर्व घटकांना शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा अधिकार मिळवून देणारे लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त केएसबी चौक परिसरातील महाराजांच्या भव्य स्मारकाला भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर माझ्या जनसंपर्क कार्यालयातही महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, संजय भोसले, डॉ. पियुष कडूस, सिस्टर वाघमारे तसेच आशा वर्कर्स उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी दिलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

