पुणे,दि.26: दि बुद्धघोष बुद्ध विहार, जुनी सांगवी पुणे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 152 वा जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सम्राट अशोक, शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुजाता निकाळजे यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते डॉ. प्रा. राजाभाऊ भैलुमे हे होते. त्यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर व सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ऍड. मा. सर्वजित बनसोडे हे होते त्यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून आज काय करण्याची गरज आहे ते सांगितले. तसेच शाहू महाराज हे भारतातील सर्वात दुर्लक्षित परंतु फार मोठे समाज उपयोगी कार्य व उपक्रम करणारे राजे होते, त्यांनी शोषित वंचितांच्या विकासासाठी भरीव कार्य केले, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. राधाकांत कांबळे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा) हे होते. यावेळी आदर्श व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर कॉम्प्युटर प्रशिक्षण वर्गा चे उद्घाटन करण्यात आले. वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव सुजाता गौतम निकाळजे तसेच उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर आयु.धनंजय सुभाष कांबळे आणि भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रवींद्र इंगोले यांनी केले व आभार प्रदर्शन सुनिता मोहिते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. हेमंत गायकवाड, आयु पिसाळ, शौर्य मोहिते, प्रतिभा कीर्तीकर्वे ,पत्रकार विजय गायकवाड, तक्षशिला महिला संघाचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

