मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे,
दौंड- दौंड नगरपरिषद कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याला अल्श्रील शिवीगाळ करून महिला चा विनयभंग करण्याचा प्रयत्न तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गब्बर वाल्मिकी (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण ) यांच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दौंड नगरपालिकेतील वय ३४ वर्षीय महिला अधिकाऱ्यांनी दौंड पोलीस स्टेशन स्टेशन येथे फिर्याद दिले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २२/०६/२०२६ रोजी सुमारे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दौंड नगरपरिषद कार्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी गब्बर वाल्मिकी हा फिर्यादी च्या सहकारी यांच्या केबिनच्या बाहेर उभे राहून त्यांच्या अल्श्रील हावभाव करून शिवीगाळ करू लागला त्याच्या वर्तनामुळे फिर्यादी च्या मनास लज्जा निर्माण झाली तसेच वाल्मीकी हाताच्या बाह्या मागे सारून यांने धमकी या भाषांचा वापरत ती येथे कशी काम करते ते पाहून घेतो असे म्हणत फिर्यादी कडे पाहून कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात 431, /2026 भारतीय न्याय सहीता 2023 चे कलम 74, 296, 351,(2) 352, आरोपी विरुध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

