Monday, September 28, 2026
Homeदौंडदौंड नगरपरिषद दौंड येथील नगरसेवक शहानवाज खान ...

दौंड नगरपरिषद दौंड येथील नगरसेवक शहानवाज खान पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र वैध

दौंड : दौंड तालुका प्रसिद्ध ॲड. फिरोज बाबुलाल शेख यांनी कायदेशीर भक्कम पुरावे दिल्याने ॲड. बार असोसिएशनचे वतीने विशेष जहीर सत्कार करण्यात आला. दौंड- दौंड नगरपरिषद दौंड प्रभाग क्रमांक ३ चे नागरिक हित संरक्षण मंडळा,भाजप,आर.पी.आय, आघाडी आणि पी.आर.पी.गटातर्फे(इतर मागास वर्ग ) निवडून आलेले विद्यमान नगरसेवक शहानवाज खान यांचे जिल्हा जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने पुणे वैध (Valid) ठरविले आहे.

या प्रकरणात कायदेशीर बाजू यशस्वीपणे मांडल्याबद्दल नागरिक हित संरक्षण मंडळाचे नगरसेवक आणि दौंड तालुका ॲडवोकेट बार असोसिएशनच्या वतीने दौंड तालुका प्रसिद्ध वकील ॲड.फिरोज बाबुलाल शेख यांनी दौंड नगरपरिषद चे नगरसेवक शहानवाज खान यांच्या बाजूने कायदेशीर भक्कम पुरावे आणि युक्तिवाद सादर केला त्यांचे कायदेशीर कौशल्यामुळे जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र वैध असल्याचा अंतिम निकाल दिला या यशाबद्दल दौंड न्यायालय परिसरात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी दौंड तालुका ॲडवोकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ॲड. फिरोज बाबुलाल शेख पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व वकील व मित्र उपस्थिती होते. नगरसेवक शहानवाज खान यांच्या जात प्रमाणपत्राची जात पडताळणी छाननी केल्यानंतर समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे या निकालामुळे नगरसेवक शहानवाज खान यांचे नगरसेवकपद अबाधित राहिले असून त्यांच्या प्रभागाच्या नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्साहाचे वातावरण आहे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments