Thursday, June 11, 2026
Homeमुंबईमाता रमाई वाचल्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत. -डॉ भीमराव य आंबेडकर.

माता रमाई वाचल्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत. -डॉ भीमराव य आंबेडकर.

मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे

माता रमाई आंबेडकर यांच्या 91व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) च्या वतीने केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे विद्यमाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 44 महिलांचे दिनांक 21मे 2026 ते 27 मे 20226 पर्यंत केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी, दादर (पश्चिम) मुंबई येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन व समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते झाले. माता रमाई आंबेडकर यांना वाचण्यासाठी पूर्वी मर्यादित साहित्य होते . आता मोठ्याप्रमाणावर मराठी पुस्तके तसेच इंग्रजीत सुद्धा पुस्तके उपलब्ध झाले असून, देशात अनेक ठिकाणी स्मारकही उभारलेले आहेत.

माता रमाई यांना वाचल्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर समजणार नाहीत, असे गौरव उदगार समारोप प्रसंगी माता रमाई यांच्या स्मृतिदिन निमित्त त्यांना अभिवादन करताना काढले. यावेळी चैत्यभूमीसाठी एअर पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एस सी एस टी असोसिएशन मुंबई शाखेच्यावतीने दोन व्हील खुर्च्या भेट देण्यात आल्या त्या डॉ भीमराव य आंबेडकर आणि दर्शना भीमराव आंबेडकर वहिनी यांनी स्वीकारल्या.यावेळी ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड डॉ एस के भंडारे यांनी, माता रमाई यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणात घरच्या कोणत्याही अडचणी न सांगता, उलट प्रोत्साहन दिले, माता रमाई मुळेच बाबासाहेब जगाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले आहेत व माता रमाई ने घरची अडचणी पेक्षा समाजाचे हित जपले असल्याचे प्रतिपादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी बी तेलतुंबडे, केंद्रीय महिला विभाग सदस्य व महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनंदा वाघमारे, मुंबई उपाध्यक्ष सुषमाताई कसबे यांनी माता रमाई यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड डॉ एस एस वानखडे होते. त्यांनी शिबिरार्थी महिलांचा लेखी परीक्षा निकाल जाहीर केला, त्यात धाराशिव दक्षिण जिल्हा शाखा अध्यक्ष राजश्रीताई कदम यांचा प्रथम क्रमांक आला. दुसरा क्रमांक ठाणे जिल्हा शाखेच्या महानंदा अरविंद चोपडे यांचा आला व तिसरा.क्रमांक जळगाव पूर्व जिल्हा शाखेच्या विद्या सुभाष झनके यांचा आला. केंद्रीय शिक्षक म्हणून पास झालेल्या सर्व नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षिकांना ॲड डॉ एस के भंडारे यांच्या हस्ते केंद्रीय शिक्षक प्रमाणपत्र व केंद्रीय शिक्षक ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव सुनंदाताई पवार यांनी केले. या कार्यक्रमास सुषमा ताई पवार ( राष्ट्रीय उपाध्यक्ष), मुंबई प्रदेश शाखा अध्यक्ष विलास वानखडे, सरचिटणीस दयानंद बडेकर, मिडिया सदस्य सिद्धार्थ अहिरे, स्वाती ताई गायकवाड ( महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष), मुंबई प्रदेश महिला सरचिटणीस छाया बनसोडे, निर्मला ताई गवळी, विनिता माने, सुनिता मस्के आणि अनेक मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्य (पुरुष / महिला ) पदाधिकारी उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे उपप्रमुख सुप्रिया ताई कासारे, सचिव अनिल मनोहर, सचिव सागर गांगुर्डे, सदस्य/ शिबीर व्यवस्थापक सुनील बनसोडे, चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे, चैत्यभूमी पुस्तकालय संचालक मिलिंद कदम, बी एस आय मिडियाचे सिद्धार्थ अहिरे व मुंबई प्रदेश तथा महाराष्ट्र राज्य महिला/ पुरुष शाखा पदाधिकारी यांनी भरपूर परिश्रम घेतले. पूजणिय भंते विशुद्ध बोधी जी यांनी शेवटी आशिर्वाद देऊन व सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments