मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.
वणी गावातील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल चा होतकरू विद्यार्थी कु.तेजस महेंद्र झोटींग याने केंद्रीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ( १०० पैकी ९० गुण ) भरघोस गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह संपूर्ण वणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक मानली जाते. अशा या परीक्षेत तेजसने आपल्या मेहनत,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उत्तम यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.त्याच्या या यशामागे त्याचे आई-वडील यांचे अथक परिश्रम,सातत्यपूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे.तेजस सध्या KRT हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असून शाळेचे मुख्याध्यापक धैर्यशील पाटील सर,वर्ग शिक्षक तुंगार सर यांनी त्याला योग्य मार्गदर्शन केले.तसेच पैठणे क्लासचे पैठणे सर यांच्या वयक्तिक मार्गदर्शनाखाली त्याने नियमित सराव व अभ्यास करून ही कठीण परीक्षा उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण केली.सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन,अभ्यासातील सातत्य आणि कुटुंबाचा आधार यामुळे तेजसला हे यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.
तेजसच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून त्याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.वणी परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद,मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भविष्यातही तेजस अशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रात मोठे यश संपादन करेल,असा विश्वास KRT हायस्कूल वणी चे शिक्षक यांचे सह वणी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट,उपसरपंच विलास कड,व चर्मकार समाजातील सामाजिक कार्यकर्ते जयदीप हनुमंत झोटींग यांचे सह परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

