Thursday, June 11, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने मारुती बनसोडे सन्मानित

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने मारुती बनसोडे सन्मानित

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीने सन 2020- 21 ते 24 -25 या कालावधीतील पाच वर्षाचे महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती. सेवा पुरस्काराचे 26 मार्च रोजी मुंबईत वितरण करण्यात आले यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ऍड .राहुल नार्वेकर साहेब ,केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब , सामाजिक न्याय मंत्री मा. ना. संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे साहेब, समाज कल्याण संचालक डॉ. दीपा मुधोळ – मुंडे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील एकूण 100 व्यक्ती आणि 13 संस्थांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यात धाराशिव जिल्ह्यातून मारुती बनसोडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, आणि रोख 15000 रुपये राज्य शासनाने देऊन व्यसन मुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

मारुती बनसोडे हे गेली तीन चार वर्षे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक म्हणून काम करीत आहेत. अनेक शाळा, कॉलेज मध्ये जाऊन ते प्रबोधनाचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून त्यांना सन्मानित केल्या नंतर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments