Thursday, June 11, 2026
Homeदौंडभारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व तालुका यांच्या वतीने प्रियंदसी...

भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व तालुका यांच्या वतीने प्रियंदसी चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी: विजय बगाडे

दौंड – दौंड भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था दौंड शहर व तालुका यांच्या व दौंड शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे अध्यक्ष अध्यक्षतेखाली व पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) व श्रमिक ब्रिगेड पक्षाचे विशाल पाळेकर व बौद्ध महासभा कार्यकारिणी सदस्य संघटक उपासक यांच्या संयुक्त वतीने प्रियंदसी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक साजरी करण्यात आली प्रथमता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास व चक्रवती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आले धम्म वंदना त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले समता सैनिक दल मार्फत सलामी देण्यात आली या पवित्र प्रसंगी शहर व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका अध्यक्ष कोकाटे, मयुर पानसरे , भारतीय बौद्ध महासभा दौंड माजी अध्यक्ष श्रीकांत शिंदे, माजी सरपंच डाळिंबे, पंचायत समिती विकास कदम, प्राध्यापक डॉ. अरूण जाधव, जयदीप बगाडे, श्रीकृष्ण मोरे, भगवान शिंदे, बबन बनसोडे, विशाल सिदगणे, देविदास पालेकर, संदीप कांबळे, मोरे, माने, संजय आढव, अनेक उपासक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्राध्यापक अरुण जाधव श्रीधर बाळेकुंद्रि व श्रीकांत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्वनी भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्था यांच्या संयुक्त रितीने संकल्प यशस्वी करु असे सुचविण्यात आले या कार्यक्रमात सर्व विविध सामाजिक संघटना यांनी सहकार्य केले. चक्रवती सम्राट अशोक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आला दोन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष श्रीकांत साळवे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

- Advertisment -

Most Popular

Recent Comments