मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड – दौंड पुणे बारामती दैनंदिन प्रवाशांची होणारी गैरसोई थांबवावी आणि गाड्या वेळापत्रकानुसार न सोडल्यामुळे प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागतो दौंड पुणे व बारामती डेमू रेल्वे लोकांने असंख्य कामगार वर्ग व शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी रेल्वे ने प्रवास करतात व व्यापारी वर्ग पुणे दौंड व बारामती डेमू रेल्वे प्रवासी करत असतात तरी रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या वेळापत्रकानुसार रेल्वे डेमू सोडून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी विद्युत लोकल सुरू करावी व ज्यादा फेऱ्या करावे तसेच रेल्वे विद्युतीकरण होऊन अनेक वर्षां झाले आहेतरी केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार व स्थानिक प्रतिनिधी कडून दौंड रेल्वे जंक्शन स्टेशन चा विकास हा फार मंदगतीने होताना दिसत आहे व निवडणूक दरम्यान अनेक पुढारी प्रवशांची भेटीगाठी घेऊन सोबत प्रवास करणे जाहिरात करणे व प्रवासी वर्गाला आश्वासन पुरतेच ठेवणे व विकास वर दुर्लक्ष करणे अशी चर्चा प्रवासी वर्ग कडून केली जाते.
तसेच ह्या गाड्या ७१४०२ दौंड-पुणे डेमू (सकाळी ६:०५ वा.)७१४०४ दौंड-पुणे डेमू शटल (सकाळी ७:०५ वा.)७१४०६ बारामती-दौंड-पुणे डेमू (८:२५ वा.)७१४०७ पुणे- दौंड डेमू (दुपारी ३:००वा.)७१४११ पुणे- दौंड बारामती डेमू (संध्याकाळी ६:४५ वा.) ७१४१३ पुणे दौंड डेमू (रात्री ८:०५ वा.) या गाड्या अनियमित वेळेबाबत दैनंदिन प्रवाशांची होणारी गैरसोई ही थांबवण्यासाठी आणि या गाड्या वेळेवर धावतील यांची खात्री द्यावे प्रायोगिक तत्त्वावर दौंड- पुणे – शटल साठी अतिरिक्त कोच लावावे दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळा व हरित वातावरण मिळावे यासाठी रेल्वेच्या जागेत उद्यान कसे विकसित करता येईल याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. प्रामुख्याने वरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे याची दखल घ्यावी यावर (D R M) विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दौंड-पुणे डेमू गाड्यांच्या अनियमित वेळेबाबत दौंड -पुणे डेमू गाड्या अनियमित धावत असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात दौंड प्रवासी वर्गाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने वरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे दैनंदिनी प्रवाशांची होणारी गैरसोई थांबवण्यासाठी आणि गाड्या वेळेवर धावतील यांची खात्री दिली प्रायोगिक तत्त्वावर दौंड-पुणे शटल साठी अतिरिक्त कोच लावून एक ट्रायल लवकरच करण्यात येणार आहे आणि त्या नंतर इतर डेमू लोकल ला अतिरिक्त कोच लावणार असल्याचे (D R M) राजेश कुमार वर्मा यांनी दौंड नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे- पाटील यांना दिले या भेटीदरम्यान दौंड नगरपरिषद चे मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगरसेवक इंद्रजीत जगदाळे- पाटील व दौंड-पुणे बारामती असंख्य प्रवासी वर्ग उपस्थित होते.

