Monday, September 28, 2026
Homeकोल्हापूरमहसूल व पोलीस प्रशासनाने हद्दपार, तडीपारची प्रकरणे तातडीने निकाली काढा ...

महसूल व पोलीस प्रशासनाने हद्दपार, तडीपारची प्रकरणे तातडीने निकाली काढा -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे,

कोल्हापूर दि. 8 : आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्व, दसरा, दिवाळी व अन्य सण, उत्सवांच्या काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यस्था सुरळीत रहावी. सण उत्सव शांततेत व आनंदी वातारणात पार पडावेत यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने समन्वयाने हद्दपार, तडीपारची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महसूल व पोलीस प्रशासनातील समन्वयाच्या अनुषंगाने आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्था ही पोलीस व महसूल विभागाची जबाबदारी असून दोन्ही विभागांनी समन्वयाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबाजवणी करावी, असे आदेशित करुन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कलम 55 अंतर्गत टोळ्या किंवा समूह यांची हद्दपार (तडीपार) कारवाई, कलम 56 अंतर्गत एखाद्या विशिष्ट क्षेत्रातून तडीपार याबाबतची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत या बाबत आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जाईल असे सांगितले.

एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधात्मक स्थानबध्देतेचे आदेश काढताना दक्षता घेण्यात याव्यात अशा सूचना देवून जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गुन्ह्यांची संख्या कमी होण्यासाठी समन्वय राखून काम करावे. भारतीय नागरिक संहिता कलम 126 नुसार चॅप्टर केसेस प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात यावीत. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधातील प्रकरणे (एमपीआयडी) अंतर्गंत न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. गुन्हेगारीबाबत पोलीस प्रशासनाकडून महसूल विभागाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव परिपूर्ण असावेत. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. येणाऱ्या काळात सर्व सण उत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येकांनी आपआपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल विभाग समन्वयाने काम करीत आहे असे सांगून पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, येत्या काळामध्ये गणेशोत्सवासह येणाऱ्या महत्त्वाच्या सण काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचे 24X7 काम सुरु राहणार आहे. तातडीची मदत या कक्षाच्या मध्यमातून पोहचविली जाणार आहे. शासनाच्या आदेशानूसार विविध नियंत्रण समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. शस्त्र परवाना जिल्ह्यातील शस्त्रांची माहिती महसूल यंत्रणेच्या समन्वयाने घेण्यात येत आहे. गुन्ह्यांची प्रलंबीतता वाढू नये यासाठी परिपूर्ण प्रस्ताव महसूल यंत्रणेकडे सादर करण्यात येत आहेत. मान्यता मिळालेल्या प्रस्तावांवर पोलीस प्रशासन तातडीने कार्यवाही करुन तडीपार, हद्दपारीची प्रकरणे निकाली काढण्यावर भर देत आहे. जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेषत: शहरी भागामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी कायदा व सुवस्था संदर्भात संगणकीय सादरीकरण केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments