मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड: ७ सप्टेंबर २०२६तथागत भगवान बुध्दाने अनाथपिंडकाचे जेतवनात माणसाने सज्जनांची संगत धारावी, योग्य ठिकाणी वास करावा,आई वडिलांची श्रमन- भंतेची सेवा करावी ,मुला बाळांचा पत्नीचा आदरपूर्वक सांभाळ करावा,रिकाम्या उठाठेवी न करता कुशल कर्मात दिनचर्या करावी, असे विचार सांगितले आहेत.या महामंगल सुत्ताचे मार्गाने आचरण करावे.त्यामुळे माणसाचे जीवन पवित्र बनते असे विचार आयु.श्रीकृष्ण मोरे केंद्रीय शिक्षक यांनी दौंड मध्ये व्यक्त केले.
बुध्दीस्ट नालंदा बहु उद्देशिय प्रतिष्ठान आनंद नगर यांचे वतीने गणेश सोसायटी चे अध्यक्ष व माजी बँक मॅनेजर गोरख घोडके यांचे निवासस्थानी वर्षावासाचे १० वें पुष्प आयु.बी. वाय.जगताप सचिव यांचे अध्यक्षतेखाली गुंफण्यात आले.
अध्यक्ष निवड व सूत्र संचालन दिलीप आढाव यांनी केले,तर प्रास्ताविक आयु.विजयकुमार गायकवाड यांनी केले. समूचित विषयावर आयु.अरुण ओहोळ माजी पोलिस उप अधीक्षक,बी. वा य.जगताप व विजयकुमार गायकवाड यांनी विचार व्यक्त केले.आभार आयु गोरख घोडके यांनी मानले.या कार्यक्रमास के.के.खंडिझोड,सुरेखा घोडके,तेजस्वी घोडके,प्रियांका साळवे,नीलम घोडके,सागर घोडके,जयदीप बगाडे,जयश्री गायकवाड,सारिका आढाव,सैदप्पा गायकवाड उपस्थित होते.नांदेड येथे नुकताच तुफानातील दिवे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाले बद्दल निर्भिड पत्रकार जयदीप बगाडे यांचा सत्कार करण्यात आला.

