Sunday, July 26, 2026
HomeUncategorizedधर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे आनंदोत्सव; माटुंगा लेबर कॅम्पमध्ये लाडू...

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे आनंदोत्सव; माटुंगा लेबर कॅम्पमध्ये लाडू वाटप

मुंबई, दि. २६ जुलै २०२६ : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, माटुंगा लेबर कॅम्प येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रपतींनी २५ जुलै २०२६ रोजी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

२० जुलै २०२६ रोजी नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापक जनजागृती केली.

माटुंगा लेबर कॅम्प, वॉर्ड क्रमांक १८९ मध्ये वॉर्ड अध्यक्ष गणेश सवणे, उपाध्यक्ष मिलिंद काळे, प्रफुल राजगुरू, गोंदिया राजू पाटील, अजय देठे, बाळू धांडोरे, नरसिंग गुर्रम आणि दिलीप कांबळे यांनी विभागातील नागरिक, दुकानदार संघटना, टॅक्सी संघटना तसेच व्यापाऱ्यांशी संपर्क साधून महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमाला समता संघर्ष विचार मंच यांचीही मोलाची साथ लाभली. डॉ. सुरेश सावंत, अनिल भंडारे, भाई गणेश बच्छाव, धर्मेश निकम, बाबा लोंढे आणि प्रकाश लांडगे यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृती मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. या प्रयत्नांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने माटुंगा लेबर कॅम्प परिसरात बंद यशस्वीपणे पाळण्यात आला.

त्यानंतर देशभर वाढलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

या पार्श्वभूमीवर रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता माटुंगा लेबर कॅम्प येथील संगम हॉटेल परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील संघर्षाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात ईव्हीएम मशीनसंदर्भातील आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. उपस्थितांनी संघटितपणे लोकशाही मार्गाने जनआंदोलन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments