Sunday, July 26, 2026
HomeUncategorizedॲडव्होकेट्स असोसिएशन स्मॉल कॉजेस कोर्टतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्नमुंबई, दि. १६ जुलै...

ॲडव्होकेट्स असोसिएशन स्मॉल कॉजेस कोर्टतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्नमुंबई, दि. १६ जुलै २०२६ : समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी

मुंबई मूकनायक विशेष

ॲडव्होकेट्स असोसिएशन स्मॉल कॉजेस कोर्टतर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

मुंबई, दि. १६ जुलै २०२६ : समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपत ॲडव्होकेट्स असोसिएशन स्मॉल कॉजेस कोर्ट यांच्या वतीने गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी एल. टी. मार्ग येथील स्मॉल कॉजेस कोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावर भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “Donate Blood, Save Lives” या संदेशाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.रक्तदान हे मानवतेच्या सेवेसाठी सर्वोच्च दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, या भावनेतून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.या समाजोपयोगी उपक्रमाचे नेतृत्व ॲडव्होकेट्स असोसिएशन स्मॉल कॉजेस कोर्टचे अध्यक्ष अॅड. सचिन गेल्ये यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. संतोष हरिदास, मानद सचिव अॅड. खुशी भद्रीचा, संयुक्त सचिव अॅड. प्रशांत तावसाळकर आणि खजिनदार अॅड. धनंजय राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समिती सदस्य अमी चंदन, सरिता खैरकर, शैलेश पोकारणे, मदनेश सिंग, प्रतिभा लोखंडे, प्रतिक्षा विचारे, कुणाल वोरा, विजय राजपूत, नॅन्सी परेरा आणि प्रियल गोगरी यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांच्या समन्वयातून हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होण्यास मदत झाली असून गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले. भविष्यातही अशाच समाजहिताच्या आणि लोककल्याणकारी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.रक्तदानाच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत, अधिकाधिक नागरिकांनी नियमित रक्तदान करून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments