Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रटेंभुर्णीच्या यश आळणे यांची IIT मद्रासमध्ये निवड; JEE Advanced मध्ये घवघवीत यश

टेंभुर्णीच्या यश आळणे यांची IIT मद्रासमध्ये निवड; JEE Advanced मध्ये घवघवीत यश

वसमत : इंजिनिअरिंग क्षेत्रातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या JEE Advanced परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून टेंभुर्णी येथील यश राजकुमार आळणे यांनी प्रतिष्ठित IIT मद्रास येथे प्रवेश निश्चित केला आहे. ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून हे यश मिळवत त्यांनी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

लहानपणापासूनच अभ्यासू, हुशार आणि जिद्दी असलेल्या यश यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले. त्यानंतर अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी JEE Advanced परीक्षेत यश मिळवून IIT मद्रासमध्ये प्रवेश निश्चित केला.

टेंभुर्णीसारख्या ग्रामीण भागातून IIT मध्ये प्रवेश मिळवणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. यश यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गावकरी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

याप्रसंगी अरविंद आळणे, साहेबराव आळणे, गणेशराव आळणे, जगन्नाथराव आळणे, मनोहर इंगोले, मधुकर आळणे, उमराव आळणे, दीपक आळणे, मिलिंद आळणे समतादूत , रुस्तुम आळणे आदींच्या हस्ते यश आळणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments