Thursday, June 11, 2026
Homeपिंपरी-चिंचवडप्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा...

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

वरिष्ठ प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पिंपरी चिंचवड दि. ३० मार्च २०२६ बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती व सर्व लेणी संवर्धक टीम महाराष्ट्र, बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड शहर, टाटा मोटर्स बुद्धिस्ट फ्रेंड सर्कल, समता सैनिक दल पिंपरी चिंचवड शहर, व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने गुरुवार दिनांक: २६/०३/२०२६ रोजी जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सत्र: प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा. अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब डोळस यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्ध वंदना सुत्त पठण घेण्यात आले व मा. अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वज फडकवण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील लेणी संवर्धक धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

द्वितीय सत्र या मध्ये सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रियदर्शि चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक/ उपासिका महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले लेणी संवर्धक, समता सैनिक दल, व धार्मिक सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सायंकाळी ७ ते ८ या वेळेत मा. प्रा. प्रकाश पवारसर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
व्याख्यानाचा विषय: प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक व बुद्ध धम्म याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नामदेव वाळके यांनी केले, व स्वागताध्यक्ष मा. राजू भालेराव इतिहास प्रेमी लेणी प्रेमी व पाली भाषा अभ्यासक होते. त्यांनी उपस्थित सर्वाचे स्वागत केले. रवी कांबळे यांनी लेणी प्रेमी इतिहास प्रेमी यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले.

सायं : ८ ते १० महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मा. कुणाल वराळे प्रस्तुत गाथा युगपुरुषांची हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला आणि या कार्यक्रमांमध्ये उपस्थित श्रोत्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमांमध्ये धार्मिक सामाजिक व लेणी संवर्धन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
समाधान सोनवणे, जोत्सना मोरे , लेणी संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट अशी कामगिरी केल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच धम्म चळवळीत सक्रिय काम करणारे, कैलास पाटील, संतोष मोरे, भास्कर पानपाटील व उपासिका जयश्री शिरसाठ यांच्या गौरव करण्यात आला.
सामाजिक व धार्मिक चळवळीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकाची फोटो फ्रेम भेट देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
बुद्ध लेणी मुक्ती आंदोलन समिती व बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड शहर, समता सैनिक दल पिंपरी चिंचवड शहर, टाटा मोटर्स बुद्धिस्ट फ्रेंड सर्कल, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्याग मूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यांनी विशेष प्रयत्न केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments