Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रसांगलीउद्यानासाठी जागा न दिल्यास आहे त्या जागेवर लक्षनिक उपोषण करू:- आँल इंडिया...

उद्यानासाठी जागा न दिल्यास आहे त्या जागेवर लक्षनिक उपोषण करू:- आँल इंडिया पँथर सेना.

माडग्याळ ग्रामपंचायत ला, दि 20/1/2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी गावठाण जमीन मिळण्याबाबत अर्ज दिला होता अध्याप ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी अध्याप दखल घेतली नाही.विषयानुसार मोजे माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथे ग्रामपंचायत मालकीची गावठाण हद्दीत जमीन असून ही जमीन खूली आहे. ह्या जवळपास चार ते पाच एकर जमीन आहे. ह्या जागेपैकी काही जागेवर आंबेडकर समाजातील नागरिक व तरुण वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यासाठी क्रीडास्पर्धा, महामानवांची जयंती, पुण्यतिथी,व्याख्यानमाला आदी कार्यक्रम गेल्या 40 ते 50 वर्षापासून घेत आहोत. सध्या ह्या जागेवर अतिक्रमण वाढत असल्याने समाजातील जनमेची ह्या खुल्या जागेतील 10 गुंटे जागा आंबेडकर उद्यानासाठी मिळावी याकरता ऑल इंडिया पँथर सेना वारंवार ग्रामपंचायत कार्यालय माडग्याळ यांच्याकडे मागणी करीत आहे. आंबेडकर समाजातील जनतेची मागणीचा सहानूभूतीपुर्वक विचार करून सरपंच व ग्रामसेवक आणि सदस्य बावडी यांनी विचार करून आंबेडकर उद्यान याकरिता 10 गुंठे जमीन द्यावे अन्यथा येत्या आठ दहा दिवसात आहे त्या जागेवर लक्ष निक उपोषण करू.

प्रतिनिधी,
विकी वाघमारे.
माडग्याळ.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments