Saturday, July 11, 2026
Homeकराड​कराड रेल्वे स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो बसवणार;...

​कराड रेल्वे स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो बसवणार; बोधी फाउंडेशनचे रेल्वे प्रशासनास निवेदन​

कराड :-दि.11 कराड रेल्वे स्टेशन येथील स्वागत कक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र (फोटो) बसवण्यात यावे, या मागणीसाठी बोधी फाउंडेशन, कराड यांच्या वतीने कराड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे, या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या विशेष शिफारशीचे पत्र रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
​या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी बोधी फाउंडेशनचे कराड अध्यक्ष अॅड. विकास मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने स्टेशन मास्तरांची भेट घेतली. यावेळी प्रामुख्याने दिपक म्होप्रेकर सर, अॅड. किशोर जाधव, यशवंत रसाळ, सतीश मस्के, आणि निकेतन जाधव यांच्यासह बोधी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची शिफारस
​कराड रेल्वे स्टेशन हे ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना देशाच्या आणि राज्याच्या या दोन थोर महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी स्वागत कक्षात त्यांचे फोटो लावणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याचे शिफारस पत्र दिले होते.
​प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
​बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. विकास मस्के यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या शिफारस पत्रानंतर रेल्वे प्रशासन यावर लवकरात लवकर आणि सकारात्मक निर्णय घेऊन स्वागत कक्षात हे फोटो सन्मानाने बसवेल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
​या निवेदनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली

i

- Advertisment -

Most Popular

Recent Comments