Monday, September 28, 2026
Homeमहाराष्ट्रधम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, आगळंबे येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वर्षावासाचा समारोप

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, आगळंबे येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वर्षावासाचा समारोप

मूकनायक मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे 9920806563

प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सामाजिक प्रबोधनासाठी उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांची अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांनी केली पाहणी

पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२६ : बौद्ध धम्मातील कार्यकर्ते, भन्ते आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आगळंबे, पुणे येथे सांचीच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांनी दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यकर्त्यांसह भेट देऊन पाहणी केली.धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीच्या उभारणीसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचे मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख विलास वंशिव यांनी या भेटीदरम्यान दिली.

मॉनेस्ट्रीची पाहणी केल्यानंतर अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांनी विलास वंशिव तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे आणि सर्व ट्रस्टींचे अभिनंदन केले. पुणे जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखांच्या वर्षावास समारोपाचा कार्यक्रम धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे आयोजित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मविषयक विचारांना अभिवादन करत आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या भेटीदरम्यान भारतीय बौद्ध महासभेचे राजरतन थोरात, पुणे महानगर अध्यक्ष व राज्य सचिव; विजय ओव्हाळ, राज्य संघटक; राधाकांत कांबळे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष; डी. व्ही. सुरवसे, पिंपरी-चिंचवड सरचिटणीस; तुळशीराम पडघन, शाखा कोषाध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याच दौऱ्यात सकाळी धायरी येथील कमल बबन कांबळे यांच्या जेतवन बुद्ध विहाराला भेट देऊन पाहणी करण्यात आली. सदर बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेला दान करण्याची त्यांची इच्छा असल्याने या संदर्भात प्रत्यक्ष भेट देण्यात आली.संध्याकाळी ट्रस्टचे चेअरमन अॅड. सुभाष जोंजाळे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पुणे पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश व्होवाळ यांच्या नेरे येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.

दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभा पुणे महानगर शाखेच्या बुक स्टॉलला भेट देऊन कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त व्यक्ती तसेच गृहिणींना उत्पन्नाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सौरभ हॉल येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर म्हाडा प्रशिक्षण केंद्र येथे म्हाडा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभेच्या संघटनात्मक कार्यासोबतच धम्म प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगार व उत्पन्नाच्या संधी आणि सामाजिक प्रबोधन या विविध क्षेत्रांत प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टीने पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments