प्रबोधनकार शंकरराव सोनवणे सभागृह दौंड भीमनगर
मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड – दौंड शहर मध्ये भिम नगर येथे प्रबोधनकार शंकरराव सोनवणे सभागृहात रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी बुद्ध वर्षावास व बुद्धमूर्ती स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा दौंड शहराच्या वतीने भिम नगर या ठिकाणी दौंड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल सखाराम सोनवणे तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष अमित सोनवणे यांच्या वतीने वर्षावास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रमुख उपस्थिती दौंड नगरपरिषद चे नगरसेवक मंगेश चलवादी होती. व तसेच सभागृहामध्ये यावेळी बुद्ध मुर्ती स्थापना माजी तहसीलदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या हस्ते सभागृहात तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्ती भेट दिलेली बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसार सोबतच समाजामध्ये प्रज्ञा शील करुणा मैत्री आणि समतेचा संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध मूर्तींची विधिवत स्थापना करण्यात आली तथागत भगवान बुद्धांनी दिलेला धम्म हा मानवतावादी विचारांचा मार्ग असून समाजात शांतता बंधुता आणि समानतेची भावना निर्माण करण्यासाठी बुद्धांच्या विचारांचे आचरण आवश्यक असल्याचे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले वर्षावास च्या काळात धम्माचा अभ्यास ध्यान चिंतन आणि धम्म देसना यांना विशेष महत्त्व असून उपस्थित धम्म बांधवांनी बुद्धांच्या शिकवणीचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचा संकल्प करावा कार्यक्रमाला उपासक उपसिका धम्म बांधव नागरिकांची उपस्थितीत बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील आणि धम्मदेसनेच्या माध्यमातून व प्रबोधनात्मक कार्यक्रमात पार पडला.भोजन दान करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पर्व संस्कार उपाध्यक्ष आयु. नामदेव शिंदे दौंड शहर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष आयु. श्रीकांत साळवे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.संजय सोनवणे यांनी केले ऑडिटर माजी नायब तहसीलदार आयु. श्रीकांत शिंदे व त्यांच्या परिवारातील सदस्य सरचिटणीस आयु. संजय सोनवणे, दौंड पंचायत समिती माजी सभापती आयु.विकास कदम, माजी नगरसेवक उत्तम सोनवणे, माजी नगरसेवक बुवा सावंत, किरण जाधव, म कोषाध्यक्ष आयु. रवींद्र कदम,आयु. प्राध्यापक आयु.किरण जाधव, आयु.प्रभाकर कोरे, आयु.अरविंद पगारे, मंजू मैरळ विठ्ठल सोनवणे आयु.राजू संसारे आयु. संजय हरिभक्त आयु.अभिजीत शिंदे अविनाश उबाळे सचिन देवरे दिलीप पगारे मीना भीम कन्या महिला अध्यक्ष ढवळे मॅडम मीना मॅडम, आयु.किरण जाधव, आयु. यश बनसोडे, आयु. विलासराव कदम, आयु.विठ्ठल सोनवणे, आयु.अमित थोरात, समता सैनिक आयु. हरीलाल साळवे, श्रीकांत साळवे आभार मानले सर्व कार्यकारणी संघटना उपस्थिती होते.

