वसमत : चंदगव्हान अंगनवाडी मातृ सुरक्षा दिनानिमित्त बार्टीच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. या कार्यक्रमात समतादूत मिलिंद आळणे यांनी मातृ आरोग्य, गर्भवती महिलांची काळजी, सुरक्षित मातृत्व तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा गयाबाई बगाटे, प्रियंका बगाटे, वकिलाबाई खंदारे, पार्वती इक्कर, सत्वशिला खंदारे, कल्पना किर्तने या आशा वर्कर तसेच वैशाली अरविंद सूर्यवंशी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. उपस्थित महिलांना मातृ सुरक्षा, आरोग्य तपासणी, पोषण आणि बार्टीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये मातृ आरोग्याबाबत जनजागृती होऊन शासनाच्या योजनांविषयी जागरूकता निर्माण झाली.आभार प्रदर्शन प्रियका बगाटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या

