Monday, July 27, 2026
Homeदौंडकुरकुंभ औद्योगिक कंपनी वसाहतीतील प्रतिनिधींना दौंड पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

कुरकुंभ औद्योगिक कंपनी वसाहतीतील प्रतिनिधींना दौंड पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- दौंड मध्ये नवीन वर्चस्व प्रस्थापित केलेले दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील कुरकुंभ ता. दौंड जिल्हा पुणे एम. आय. डी. सी. औद्योगिक वसाहतीतील विविध कंपनीतील प्रतिनिधींना दिनांक २४/०६/२०२६ रोजी सकाळी ११:३० ते १२:४० वाजता दरम्यान मिटींग आयोजन करण्यात आली होती या मीटिंग बैठकीमध्ये ३६ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते या वेळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील विविध कंपनीतील एम.आय.डी.सी. परिसरातील कंपन्या बाबत संबंधित घटनांची सविस्तर माहिती कंपनी प्रतिनिधींशी सखोल चर्चा करण्यात आली सदर मीटिंगमध्ये दोन पोलीस स्टेशन निरीक्षण हेमंत शेडगे उपस्थितीत कंपनी प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या १) महिला कामगार विषयक विशेष सुरक्षा उपाययोजना कराव्यात २) कंपनी मध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे नियमित कार्यान्वित करावे,चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे वापरावे ३) कंपनी समोरी रोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कव्हर होईल अशा रीतीने लावावेत ४) कंपनीतील कामगार यांचे व्हेरीकिकेशन करून घ्यावे. ६) कंपनीतील युनियन बाबत घडणाऱ्या घटनांच्या वेळोवेळी माहिती पोलिस स्टेशन येथे सादर करावी. ७) कंपनी मधील सुरक्षा रक्षक यांना एकाच ठिकाणी काम देऊ नये किंवा त्यांना वेग वेगळ्या ठिकाणी काम द्यावे तसेच कंपनी मधील अचानकपणे दुर्घटना किंवा अपघात घडलेल्या याप्रसंगी कामगारांच्या सुरक्षा महत्वाची आहे कामगारांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे सूचना दिल्या औद्योगिक वसाहतीमधील एम.आय.डी.सी कंपन्या प्रतिनिधींशी संबंधित घटनांची माहिती देऊन त्याबाबत खबरदारी घ्यायच्या सूचना दिल्या. दौंड पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी कंपनी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments