दौंड भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल कडून मानवंदना देण्यात आली.
मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड – राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक सामाजिक न्याय शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा दीप बहुजनांच्या जीवनात प्रज्वलित केला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना म्हणजे त्यांच्या विचारांप्रती कृतज्ञतेचा आणि कृतीचा संकल्प होय.आज जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच अनुषंगाने दौंड जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, दौंड, राजगृह बुद्ध विहार, दौंड, विश्वशांती बुद्ध विहार, पाटस, शाहू महाराज स्मारक समिती आणि शाहू महाराज रिक्षा स्टँड यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली त्रिशरण पंचशील घेण्यात आले जयघोषात मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमाला दौंड बौद्ध महासभेचे दौंड अध्यक्ष आयु. श्रीकांत साळवे, सचिव आयु.संजय सोनवणे, आयु.श्रीकांत शिंदे,आयु. नरेश डांळिबे,आयु. सोमनाथ माशाळ,आयु. नंदू बनसोडे, आयु.पांडुरंग गायकवाड, आयु.भगवान शिंदे, आयु.श्रीधर आयु. बाळकुद्रे,आयु. किरण जाधव सर,आयु. बी. वाय. जगताप,आयु. आयु.प्रभाकर कोरे, आयु.अरविंद पगारे, आयु.भाऊ पानसरे, आयु.किरण पानसरे, आयु.शिवराम लोंढे, आयु.जगदीश शिदगणे, आयु.राजेश मंथने, आयु.हिरालाल साळवे, आयु.कैलास डांळिबे, आयु.अर्जुन गायकवाड, आयु.श्रीकांत थोरात, आयु.गौतम गायकवाड आयु.नाईकनवरे (सामाजिक कार्यकर्ता), आयु.धरम गायकवाड, आयु.राजू जानराव गायकवाड (कुसेगाव), आयु.शशिकांत गायकवाड,आयु. विक्रम कांबळे,आयु. सिद्राम पोतेकर, आयु.शिवाजी हावडे, आयु.अमित थोरात, आयु.सागर सोनवणे, आयु.ऋषीकेश आहिरे, आयु.गोपाळ शिंदे, आयु.सुंदर रणधीर, आयु.संदीप कांबळे, आयु.रंजित चावरिया, आयु.अजय थोरात, आयु.शशिकांत वंटे तसेच अनेक ज्येष्ठ मान्यवर, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“मी समाजाचे काही देणे लागतो” ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता शाहू–फुले–आंबेडकरांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर बनला.उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे श्रीकांत साळवे व कार्यकारिणी यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार.आपली उपस्थिती हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद आहे. म्हणूनच आगामी सर्व सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये आपण स्वतः उपस्थित राहूया आणि इतरांनाही सोबत घेऊन येऊया. विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.

