कराड :- दि.१० कराड तालुका येथील महाविहार गोळेश्र्वर येथे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वरूप अत्यंत मंगलमय आणि शिस्तबद्ध होते वाढ
दिवसाचे औचित्य साधून सुरुवातीला सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. उपस्थित सर्वांनी धम्म देशना ग्रहण करून बाळासाहेबांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली.
वंदनेनंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला. प्रा. दीपक म्होप्रेकर यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा कार्याचा गौरव करताना वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते सचिन झिमरे यांनी आंबेडकरी पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून समाजामध्ये एकीचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा सल्लागार ॲड. विकास मस्के यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आपला पक्ष जातीमध्ये मर्यादित न राहता सर्वमान्य पक्ष होण्यासाठी जाती-जातीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लोकांच्या भावना न दुखावता लोकांच्या बरोबर संकटात उभे राहून मदत करण्याचे आवाहन केले जेणेकरून पक्षांमध्ये विविध जाती धर्माचे कार्यकर्ते तयार होऊन पक्ष संघटन वाढीस लागण्यास मदत होईल साठे सरांनी बुद्धांचे विचार हे बौद्ध लोकांपेक्षा आरएसएस संगवाले आचरण करून देशावर राज्य करत असण्याचे मत व्यक्त करून आपले संघटन हे वैचारिक असावे बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आपल्या लोकांनी आचरणात आणला तर आपण आपले प्रगती करू शकतो असे मत मांडले
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश थोरवडे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी वाढदिवसानिमित्त आपले विचार मांडले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे मोहिते सर यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर व राजकीय वाटचाली विषयी आपले विचार व्यक्त करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी साहेबराव लोखंडे सरांनी प्रस्तावना केली तसेच वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी आभार मानले याप्रसंगी दहावी परीक्षेचे संपादन केलेले अर्णव मस्के यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव प्रशांत थोरवडे , जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप ,रामचंद्र गोतपागर, हनुमंत काटे, मेश्राम सर, तसेच विविध सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

