Friday, April 17, 2026
HomeUncategorizedसंस्कार आणि समाजबंध वाढवणाऱ्या वाचनालयाचा पहिला यशस्वी टप्पा”

संस्कार आणि समाजबंध वाढवणाऱ्या वाचनालयाचा पहिला यशस्वी टप्पा”

मूकनायक मुंबई प्रतिनिधी /

एड.राजगुरू बाळकृष्ण कदम

मूकनायक प्रतिनिधी, मुंबईसायन पूर्व येथील सावित्रीबाई फुले नगर गेट परिसरात स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा या सामाजिक आणि वैचारिक उपक्रमाने आपल्या कार्याचा पहिला वर्षपूर्तीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीच्या पवित्र दिवशी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली होती. आज दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत असून, त्या निमित्ताने साध्या पण भावनिक वातावरणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी संस्थापक व सरचिटणीस ॲड. राजगुरु बाळकृष्ण कदम, अध्यक्ष आयु. अशोक शंकर शेळके, सचिव आयु. सुबोध शामसुंदर जाधव, सदस्य आयु. राजेंद्र माणिकराव तांबाते तसेच विशेष उपस्थिती म्हणून मास्टर रियांक राजगुरु कदम उपस्थित होते. वाचनालयाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि फुले वाहून अभिवादन करण्यात आले तसेच पूजापाठ करून वातावरणात प्रेरणादायी ऊर्जा निर्माण करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात ॲड. राजगुरु बाळकृष्ण कदम यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलन करून करण्यात आली, तर अध्यक्ष आयु. अशोक शंकर शेळके यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वाचनालयाच्या माध्यमातून समाजात ज्ञानप्रसार, सामाजिक जाणीव आणि एकात्मता वाढविण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा हा उपक्रम केवळ पुस्तक वाचनापुरता मर्यादित नसून, तो परिसरातील नागरिकांसाठी विचारांची देवाणघेवाण, मार्गदर्शन आणि सामाजिक ऐक्याचे एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. विशेषतः तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे.या वर्धापन दिनानिमित्त भविष्यात वाचनालय अधिक सुसज्ज करण्याचे, विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचे तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

राजगुरु बाळकृष्ण कदम

मूकनायक प्रतिनिधी, मुंबई

संपर्क: ९९२०४८७५१३

- Advertisment -

Most Popular

Recent Comments