Friday, April 17, 2026
HomeUncategorizedराष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी गणेश भाऊ पारधी...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी गणेश भाऊ पारधी यांची नियुक्ती…

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथील रहिवासी गणेश मनोहर पारधी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवक आघाडीमध्ये गोंदिया जिल्ह्यात महत्त्वाची संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी गणेश मनोहर पारधी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.

तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रविकांत ( गुड्डूभाऊ ) बोपचे यांच्या हस्ते नवनियुक्त युवक जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ पारधी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या नियुक्तीमुळे गोंदिया जिल्ह्यात युवक संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवत जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम कराल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ पारधी यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे योग्यरीत्या पालन करत संघटन बळकट करण्यासाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी सर्वश्री आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष संजय धुर्वे, ओबीसी सेल अध्यक्ष महेश कुकडे, शहर युवक अध्यक्ष टिपू सैय्यद, किशोर कुंभरे, बालक कुंभरे, अनिल रहांगडाले, रिशांत कठाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments