Thursday, June 11, 2026
Homeदौंडदौंड पोलीसांची धडाकेबाज कारवाई तब्बल ५२ किलो ३० ग्रम गांजा...

दौंड पोलीसांची धडाकेबाज कारवाई तब्बल ५२ किलो ३० ग्रम गांजा जप्त एकाला अटक

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड -दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत आमली पदार्थविरोधात मोठी कारवाई तब्बल ५२ किलो ३० ग्रम गांजा जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली दौंड पोलीसांच्या दिलेल्या माहितीनुसार दिनांक 24/04/2026 रोजी पहाटे ३:०० वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना त्यांच्या गोपनीय माहिती प्राप्त झाली गाडी क्र. M P 09 AT 2117 या कार वाहतूक मधून काही इसम बेकायदेशीर रित्या अहिल्यानगरकडून दौंड- पाटस वरुन सातारा कडे वाहतूक करुन गांजा घेऊन जाता आहे अशी गोपनीय बातमी पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलिस पथक तयार करून अहिल्यानगरकडून दौंड- पाटस कडे येणाऱ्या रेल्वे उड्डाणपूल जवळील दौंड पाटस रोडवर बॅरिगेट्स लावून नाकाबंदी लावली नाकाबंदी दरम्यान कार क्र. MP 09 AT 2117 अहिल्यानगर कडून दौंड- पाटसकडे येत असल्याचे दिसून आल्याने पोलीस पथकाने सदर कार क्र. MP 09 AT 2117 या गाडीच्या चालकास थांबवण्याचा इशारा केला असता सदर कार चालकाने नाकाबंदी ठिकाणी लावलेल्या बॅरीगेट्स ला कट मारून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पुढे चाललेली कार क्र. MP 13 ZV 8824 ह्या गाडीस पाठीमागून धडक दिली त्यावेळेस पोलीस पथकाने सदर वाहतूक कार सदर कार मधील चालकास कर मधून बाहेर काढून त्याचे नाव पत्ता विचारले असताना त्याने त्याचे नाव मुकेश धार्मिया काणोजे असल्याचे सांगितले सदर कारची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण १३,०७,५००/- रुपये किमतीचे ऐकूण ५ प्लास्टिक पिशव्या चिकटपट्टीने चिटकवलेले गुंडाळलेल्या एकूण ५२ किलो ३० ग्राम वजनाचा गांजा मिळून आला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुकेश धार्मिया काणोजे वय वर्ष ३६ रा. बलवाडी ता. बडवानी राज्य मध्ये प्रवेश असे असून त्याच्याविरुद्ध दौंड पोलीस स्टेशन गु. र. नं २५६/२०२६ एन.डी.पी.एस कायदा १९८५ चे कलम ८ (C), २० (B) प्रमाणे अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.स.ई रुपेश कदम करीत आहे एकूण जप्त मुद्देमाल 1) 1307500/-रु किमतीचा 52 किलो 30 ग्रम गांजा 2)10,00000/-रु किमतीची किया कंपनीचे सोनेट कार क्र. MP 09 AT 2117 सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, पो. स. ई. रुपेश कदम, पो.स.ई. चौधरी, पो. स. ई. साळुंखे, पो. हवा.राऊत,पो. हवा. बोराडे, पो. हवा. पांढरे, पो. कॉ.संजय कोठावळे, पो.कॉ. तुमकुटे,पो.कॉ. हजारे , पो. कॉ. पवन माने, या पोलिस पथकाने यशस्वीरित्या पार पडली

- Advertisment -

Most Popular

Recent Comments