Thursday, June 11, 2026
Homeमहाराष्ट्रअखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचा विस्तार; गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तराज (डी.टी.) गौतम...

अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचा विस्तार; गोंदिया जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तराज (डी.टी.) गौतम सर यांची निवड

गोंदिया (प्रतिनिधी):अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या कार्याचा विस्तार करत संघटनेला तळागाळापर्यंत अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत.दि. 28 एप्रिल 2026रोजी हिरडामाली येथील निवासस्थानी आयोजित विशेष सोहळ्यात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा. डॉ. खुशालचंद्र बोपचे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यात तिल्ही मोहगाव (ता. गोरेगाव) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. दत्तराज पटले (डी.टी. गौतम सर) यांची गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अधिकृत निवड करण्यात आली.

या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. गणेशभाऊ पारधी, जिल्हाध्यक्ष व्यासनारायण व्ही.टी. पटले सर तसेच बिसेन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या निवडीमुळे ओबीसी बहुजन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि महासंघाच्या ध्येयधोरणांना पुढे नेण्यासाठी हे नवीन नेतृत्व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास डॉ. बोपचे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments