मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड,दि.१७ :विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर हवालदील झालेल्या दीन दुबळ्या समाजाला आधार देणे,भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धम्मदीक्षा कार्यक्रम पूर्ण करणे,भारतातील प्रत्येक राज्यात, गावागावात भारतीय बौद्ध महासभा शाखेचे कार्य पोहचविणे,कफ परेड रोड मुंबई येथे डॉ.बाबासाहेब यांचा पुतळा साकारणे,महाड स्मारक,चैत्य भूमी स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे इत्यादी , कामे भैय्यासाहेबांनी पूर्ण केली.बुध्दभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये जनता, प्रबुद्ध भारत पेपर नियमित छापून सर्वत्र वितरीत करणे,भूमिहीनांना जमिनी मिळवून देणे,मुंबई विधान सभा सदस्य,मुबई विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून केलेले कार्य महान व दैदिप्यमान होते,असे विचार आयु. विजयकुमार गायकवाड कार्यालयीन सचिव यांनी नालंदा बुध्द विहार भवानीनगर येथे व्यक्त केले. भैया साहेब आंबेडकरांचा पूर्ण जीवन पट त्यांनी आपल्या भाषणात सांगितला.समुचीत विषयावर आयु.बी. वाय.जगताप व प्रा डॉ.भीमराव मोरे यांनी विचार प्रगट केले.
प्रास्ताविक गोरख घोडके यांनी तर सूत्र संचालन सुंदर रीतीने आयु.दिलीप आढाव यांनी केले तर आभार आयु अरुण ओहोळ यानी मानले.कार्यक्रमास सूर्यकांत जानराव, सैदप्पा गायकवाड,के.के.कांदिझोड इत्यादी सह अनेक उपासक हजर होते.

