Thursday, February 26, 2026
Homeदेशमणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं...

मणिपूर Video प्रकरण: ‘आमच्या समाजाला डाग लावला’, म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर.

मूकनायक न्यूज नेटवर्क (बारामती शहर मूकनायक प्रतिनिधी गणेश मच्छिंद्र भोसले )

Manipur Viral Video Accused House Set On Fire: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जमावामधील प्रमुख आरोपीला त्याच्या गावामधून अटक केली आहे. यानंतर गावकरीही संतापले आणि त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.
मणिपूरमधील महिलांनी येथील कुकी समाजातील महिलांबरोबर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घराला आग लावली आहे. ही घटना चेकमाई परिसरामध्ये घडली आहे. अचानक या आरोपीच्या घरावर मोठ्या संख्येनं जमावाने हल्ला केला. या जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. आरोपीच्या घराला आग लावल्याच्या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आग लावणाऱ्या जमावामध्ये बहुतांश महिला असल्याचं दिसत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments