मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
मुंबई : उपवर्गीकरण याचा विरोधात मंबई येथे भर पावसात लाखो भिम सैनिकांचा महामोर्च सरसेनानी आनंदराज आंबेडकर( रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष) तसेच डॉ. भिमराव आंबेडकर(राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल) यांच्या नेतृत्वाखाली मंबई मेट्रो सिनेमा मेट्रो स्टेशन येथे महामोर्च ची सुरूवात झाली संपूर्ण अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातीतील लोकांनी एकत्र येऊन आज मुंबईत ऐतिहासिक महामोर्चा काढण्यात आला आमच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, व एकता प्रगतीचे दुश्मन सरकारला भिम सैनिकांनी महामोर्चा चा माध्यमातून दाखवून दिले राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून आलेले भीमसैनिक, माता-भगिनी, युवक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि संविधान प्रेमी नागरिक यांनी आजच्या महामोर्चा मधून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आजच्या महामोर्चा तून एक स्पष्ट संदेश सरकारला देण्यात आला की अनुसूचित जातींचे हक्क कोणाच्याही कृपेने मिळालेले नाहीत हे हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने दिलेले आहे व अनेक पिढ्यांच्या संघर्षाने प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे सरकार आमच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही निर्णय वर समाज कदापि स्वीकारणार नाही. महामोर्चा दरम्यान संविधान प्रस्तावना वाचन, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक न्यायाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेले “जय भिम” , “संविधान बचाव,” “उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणांनी मुंबई दुमदुमली आजच्या महामोर्चा ने सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न देशभर तीव्र लोक आंदोलनाला सामोरे जाणार आहे संविधान आरक्षण आणि सामाजिक न्यायावर कुठलंही आघात सहन केला जाणार नाही. आता सरकारने जनभावनेचा आदर करून अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण निर्णय तात्काळ मागे घ्यावे अन्यथा हा लढा मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही तर राज्यभर व देशभर अधिक व्यापक स्वरूपात लढा उभा राहिल.
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका व्यक्त करत. सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींशी अनुसूचित जातीतील सर्व आमदारांची बैठक आयोजित करून उपवर्गीकरण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले. तत्वाला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याची तीव्र भावना या महामोर्चा तून व्यक्त झाली.जेव्हा आमच्या मूलभूत संविधानीक हक्कांवर प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकत नाही.आसा इशारा सरसेनानी आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी सरकारला दिला आहे.

