Sunday, July 26, 2026
Homeठाणेशिवसेना शिंदेगट खासदार संजय दिना पाटील ह्यांच्या विरोधात भिवंडी पत्रकार संघातर्फे तिव्र...

शिवसेना शिंदेगट खासदार संजय दिना पाटील ह्यांच्या विरोधात भिवंडी पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध.

ठाणे मुकनायक प्रतिनिधी- राजरत्न जाधव

ठाणे : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घाडामोडीतील हालचाली पाहता राज्यात ठीकठीकाणी बदलत्या ऋतुप्रमाणे राजकीय वातावरण तापल्याचे आपण पाहत असतो.अशाच घडामोडीमध्ये सत्ताधार्याना त्यांच्या राजकीय प्रणालीबाबात प्रश्न विचारणारा जनतेचा दुवा तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारीता.जनतेच्यऻ विविध समस्यांवर प्रकाश टाकणारा चौथा स्तंभच सुरक्षित नसेल तर ही आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी हार असेल.नुकताच सत्तेच्या जोरावर माजलेल्या राज्यातील शिवसेना शिंदेगट खासदार संजय दिना पाटील ह्यांनी प्रश्न विचारणार्या पत्रकारांवर मारहानीची तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला.ह्यात पत्रकारांना अवार्च्य भाषेत शिवीगाळ व मारहानीची धमकी देण्यात आली.

जर प्रशासनातील प्रतिनीधींना प्रश्न विचारल्यानंतर जर लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाला जर असा धोका उद्भवत असेल तर समजा तुम्ही देशात हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहात.आणि प्रशासनाकडुन जर अशा पद्धतीचा दबाव तंत्र वापरून पत्रकारांच्या निर्भिड स्वातंत्र्यावर गदा येत असेल तर येणार्या काळात कुणीही जनतेचा आवाज स्पष्टपणे मांडु शकणार नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री एक नाथजी शिंदे ह्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन खासदार संजय पाटील ह्यांच्यावर कार्यवाही करावी.तसेच ह्या घटनेचा आम्ही देशातील सर्व पत्रकार बांधव तसेच राष्ट्रीय मुकनायक मिडीया तिव्र निषेध व्यक्त करत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments