Thursday, July 16, 2026
Homeमंबईअनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक ३० जून सकाळी 11 वाजता रोजी...

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक ३० जून सकाळी 11 वाजता रोजी मेट्रो सिनेमा ते मंत्रालय भव्य महामोर्चा समता संघर्ष विचार मंच यांच्या वतीने जनजागृती अभियान

मूकनायक मुंबई ब्युरो चीफ / प्रकाश लांडगे 99208065

, दि. २१ जून २०२६ : महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये फूट पाडून सामाजिक ऐक्याला तडा देण्याच्या उद्देशाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण राबविण्यात येत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५९ अनुसूचित जातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांवर परिणाम होईल, अशी भावना समाजातील विविध घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींमधील ऐक्य अबाधित राखण्यासाठी आणि उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी

मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मंत्रालय या मार्गावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामोर्चा सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब तसेच सन्माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.महार, मांग, चांभार, ढोर यांसह अनुसूचित जातीतील सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवावी आणि उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी अधिक प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन समता संघर्ष विचार मंच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी

महामोर्चाच्या जनजागृतीसाठी समता संघर्ष विचारमंचच्या वतीने दि. २२ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील विविध विभागांमध्ये चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.चौकसभांचे वेळापत्रक सोमवार, दि. २२ जून २०२६सायंकाळी ७.०० वाजता – शाहूनगर आणि गीतांजली नगरनेतृत्व : प्रकाश लांडगे, प्रवक्ते मंगळवार, दि. २३ जून २०२६सायंकाळी ७.०० वाजता – एफ वॉर्ड, वाल्मीक नगर आणि बी वॉर्डनेतृत्व : मिलिंद काळे,, दि. मंगळवार २४ जून २०२६सायंकाळी ७.०० वाजता – सिद्धार्थनगर, ई वॉर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकनेतृत्व : भाई गणेश बच्छाव, प्रमुख संघटक गुरुवार, दि. २५ जून २०२६सायंकाळी ७.०० वाजता – रमाबाईनगर आणि मिलिंद नगरनेतृत्व : युवराज सरतापे, प्रवक्ते, शुक्रवार दि. २६ जून २०२६सायंकाळी ७.०० वाजता – इराणी हॉटेल परिसर, छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम अध्यक्ष : गणेश सवणे, अध्यक्ष प्रमुख वक्ते : अनिल भंडारे, प्रमुख नेतृत्व : डॉ. सुरेश सावंत, सरचिटणीस, अनुसूचित जातींच्या ऐक्यासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी या जनजागृती अभियानात आणि महामोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन समता संघर्ष विचारमंच च्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक : समता संघर्ष विचारमंच अध्यक्ष – गणेश सवणे कार्याध्यक्ष – मिलिंद काळे सरचिटणीस – डॉ. सुरेश सावंत खजिनदार – राजू पाटील, अतुल बागुल प्रमुख संघटक – भाई गणेश बच्छाव, अनिल भंडारे, श्रीकांत आढाव, डी. के. कांबळे सन्माननीय बौद्धाचार्य – आयुष्यमान प्रकाश लांडगे गुरुजी, आयुष्यमान युवराज सरतापे गुरुजी सदस्य – अजय देठे, नरसिंग गुर्रम, बाबा लोंढे, परेश मोटे, आर. वाय. कांबळे, दिलीप सोहनी, बिपिन सोहनी, विशाल निर्भवणे, संजय जाधव, मुकेश भालेराव, धर्मेश निकम, संतोष माघाडे, सुहास काटे, श्याम झेंडे, निलेश गांगुर्डे महेंद्र धांडोरे, भारतीताई शिंदे, तेजस वाघमारे

मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी : प्रकाश लांडगे अधिक माहितीसाठी संपर्क :प्रकाश लांडगे प्रवक्ते, समता संघर्ष विचारमंच 9920806563

- Advertisment -

Most Popular

Recent Comments