Thursday, June 11, 2026
HomeUncategorizedपुण्यात माजी मंत्री दयानंद मस्के यांच्या 'माझा बाप जगन्नाथ' पुस्तकाचे तसेच कविता...

पुण्यात माजी मंत्री दयानंद मस्के यांच्या ‘माझा बाप जगन्नाथ’ पुस्तकाचे तसेच कविता संग्रहाचे भव्य अनावरण!

​८४ व्या वाढदिवसानिमित्त दिमाखदार सोहळा; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती
​पुणे, दिनांक:31 महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण, झोपडपट्टी पुनर्विकास व खार जमीन विकास मंत्री, आदरणीय मा. नामदार श्री. दयानंद मस्के साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यात एका भव्य व ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सुवर्णक्षणी दयानंद मस्के साहेब यांनी लिहिलेल्या “माझा बाप जगन्नाथ” या अत्यंत प्रतीक्षित पुस्तकाचा प्रकाशन व अनावरण सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीमध्ये संपन्न झाला.
​या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.या कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी व मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत मस्के साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा गौरव केला, तसेच त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
​एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण
‘माझा बाप जगन्नाथ’ हे पुस्तक केवळ एक साहित्य नसून मस्के साहेबांच्या जीवनाचा आणि अनुभवांचा गाभा आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. या ऐतिहासिक आणि कौटुंबिक सोहळ्याला साक्षीदार होण्याचे भाग्य उपस्थित पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर. साहित्यिक लेखक तसेच दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य असणारे ज. वि. पवार साहेब त्याचप्रमाणे शाहीर संभाजी भगत यांच्यासह सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पुस्तक आणि प्रकाशन व कविता संग्रह यांच्या प्रकाशाच्या कार्यक्रमास उपस्थित होते ,

तसेच कुटुंबामधील त्यांचा मुलगा प्रज्ञानंद मस्के, शैलेश मस्के ,सतीश मस्के, राजानंद मस्के ,विजयानंद मस्के त्यांच्या जावई तसेच मुली यांच्यासह नातवंडे आणि पैपाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते .याप्रसंगी बोधी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट विकास मस्के ,उपाध्यक्ष किशोर जाधव ,सचिव प्राध्यापक दीपक म्होप्रेकर तसेच सदस्य निकेतन जाधव यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण पुणे शहरात या सोहळ्याची आणि मस्के साहेबांच्या सामाजिक योगदानाची मोठी चर्चा रंगली होती

- Advertisment -

Most Popular

Recent Comments