वसमत: बालाजी अस्थिव्यंग शाळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच जयघोषात अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. उपस्थितांनी संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले..
यावेळी अध्यक्षस्थानी संजय सपकाळ( डिव्हिजन एलआयसी मॅनेजर) हिंगोली प्रमुख पाहुणे मिलिंद आळणे (समतादूत बार्टी,) अशोक शंकर पाईकराव (प्रभारी मुख्याध्यापक) मान्यवर उपस्थित होते. सार्थक कांबळे, सचिन सपकाळ, शेख चाऊस तसेच युवक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, धर्मरक्षण आणि स्वाभिमानी विचारांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संपूर्ण परिसर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

