Thursday, June 11, 2026
Homeदौंडदौंड शहर मध्ये वाढत्या गुन्हेगारीचे सत्र सुरूच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे...

दौंड शहर मध्ये वाढत्या गुन्हेगारीचे सत्र सुरूच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाला अटक

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी: विजय बगाडे

दौंड- दौंड शहर मध्ये वाढती गुन्हेगारीमुळे दौंड शहर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दौंड शहरांच्या गुन्हेगारीला कोणाचे पाठबळ आहे का याची पोलीस प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी दिनांक- 22/04/2026 रोजी सायंकाळी सुमारास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पावर यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली खडकी ता. दौंड जिल्हा पुणे येथील इसम छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वैभव संजय शिंदे हा इसम राहणार खडकी ता. दौंड जिल्हा पुणे हा संशयास्पद हालचाली करीत आहे असे दिसून आले त्यांच्याकडे अवैधरित्या शस्त्र असल्याची शक्यता आहे सदर माहितीच्या आधारे दौंड पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 देशी बनावटीचे पिस्टल 3 व 3 जिवंत काडतुसे असे मिळून आले.जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत सुमारे 53,000/- रु. इतके आहे.

त्याकडे चौकशीदरम्यान आरोपीने सदर शस्त्र हे अवैधरित्या खरेदी केल्याची कबुली दिली आहे याप्रकरणी आरोपी विरुध्द भारतीय शस्त्र कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलिस हवालदार नितीन बोराडे, पोलीस हवालदार सुभाष राऊत,अमीर शेख, निखिल जाधव,किरण पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल पवन माने,संजय कोठावळे, नितीन दोडमिसे, पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार करीत आहेत दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पडली

- Advertisment -

Most Popular

Recent Comments