Friday, April 17, 2026
Homeदौंडदौंड स्प्रिंग हिल अपार्टमेंटमध्ये विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

दौंड स्प्रिंग हिल अपार्टमेंटमध्ये विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी: विजय बगाडे

दौंड -आज १४ एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली न्याय, समता आणि बंधुता, सामाजिक समानता मानवता,व शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यांचा संदेश देणारे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून आज जयंती उत्सव निमित्त दौंड स्प्रिंग हिल अपार्टमेंट. (काॅडलाईन लेन ) या ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व जाती व धर्माच्या लोकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. स्प्रिंग हील अपार्टमेंटचे मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश सागर सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

प्रथमता तथागत गौतम बुद्धांच्या व विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात त्रिशरण पंचशील व गौरवगाथ पठण करण्यात आली स्प्रिंग हिल अपार्टमेंट अध्यक्ष ज्ञानेश सागर सर व विद्यार्थी व महिलांनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषणे करण्यात आली कार्यक्रमाच्या ठिकाणी अन्नदाना कार्यक्रम करण्यात आले सूत्रसंचालन मूकनायक पत्रकार विजय बगाडे व संदेश शिंदे ( उत्कृष्ट सामाजिक कार्य). तसेच सामाजिक कार्यकर्ते आयु.संजय बगाडे, आयु.संग्राम शिंदे, .आयु.श्रीकांत शिंदे आयु. विनोद पिंपाराळे, आयु. दत्ता नांदगुडे , आयु. कांबळे सर आयु.राहुल, आयु.भागवान मोहीते, आयु. मयूर ओहोळ आयु. विशाल कांबळे अपार्टमेंटमधील नागरिक व कार्यकर्ते व महिला विद्यार्थी लहान मुले मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात उपस्थिती होती मुलांनी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गायली व कार्यक्रम संपन्न झाला

- Advertisment -

Most Popular

Recent Comments