Thursday, June 11, 2026
Homeदौंडरूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर स्वराज्य शक्ती सेनेचा मोठा विजय!

रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर स्वराज्य शक्ती सेनेचा मोठा विजय!

करुणा मुंडे यांची शक्तीपुन्हा सिद्ध

दौंड प्रतिनिधी

दौंड : राजकारणात आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘स्वराज्य शक्ती सेने’च्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय धमाका केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी जो लढा पुकारला होता, त्याला अखेर यश आले असून चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर आता रूपाली चाकणकर यांच्या रूपाने करुणाजी मुंडे यांनी दुसरी मोठी राजकीय ‘विकेट’ पाडल्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगू लागली आहे.

दिलेला शब्द पाळला: सोमवारी राजीनामा होणार, हे आधीच सांगितले होते!

करुणाजी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच अत्यंत आत्मविश्वासाने जाहीर केले होते की, सोमवारपर्यंत रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाईल. राजकारणात अनेकदा अशा घोषणा हवेत विरून जातात, पण मुंडे यांनी दिलेली ही ‘डेडलाईन’ तंतोतंत खरी ठरली आहे. आज झालेल्या या राजीनाम्यामुळे करुणाजी मुंडे यांच्या शब्दाला किती वजन आहे आणि त्यांची माहिती किती अचूक असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

वर्षाभराचा एकाकी लढा आणि दिल्लीपर्यंतची धाव

हा राजीनामा सहजासहजी मिळालेला नाही. गेल्या एका वर्षापासून करुणा मुंडे या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यांनी केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे, तर दिल्लीपर्यंत या प्रकरणाच्या तक्रारी पोहोचवल्या होत्या. दिल्लीतील महिला आयोगाकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे पुराव्यासकट तक्रारी देऊन त्यांनी चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्यावेळी कुणीही दखल घेण्यास तयार नव्हते, त्यावेळी करुणा मुंडे यांनी न्यायालयीन लढा देखील सुरू केला होता. त्यांच्या या चिकाटीमुळेच आज हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

धनंजय मुंडे यांच्या वेळेची पुनरावृत्ती

या घटनेने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यापूर्वी ज्यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला होता, त्यावेळीही करुणा मुंडे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यांनी दिलेली तारीख आणि वेळ त्यावेळीही खरी ठरली होती. आजही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे आता भ्रष्ट आणि कर्तव्यशून्य व्यवस्थेला हादरा बसला आहे.आता लक्ष पुढील मोहिमेकडे!”

हा केवळ एका व्यक्तीचा राजीनामा नाही, तर अन्यायाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा हा दुसरा मोठा टप्पा आहे,” अशा शब्दांत स्वराज्य शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. करुणा मुंडे यांनी दिलेल्या माहितीमुळे आणि त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

एक वर्ष सलग तक्रारी देऊन, दिल्ली ते गल्ली पाठपुरावा करून आणि कायदेशीर लढाई लढून मिळवलेला हा विजय करुणा मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता यापुढे स्वराज्य शक्ती सेना कोणाच्या विरोधात दंड थोपटणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.अशी माहिती स्वराज्य शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा प्रशांत विष्णू सोनवणे यांनी मूकनायक प्रतिनिधींशी बोलताना सांगितले,

- Advertisment -

Most Popular

Recent Comments