Friday, April 17, 2026
Homeदौंडव्हाट्सअप व्हिडिओ स्टेटस ठेवल्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर...

व्हाट्सअप व्हिडिओ स्टेटस ठेवल्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर दौंड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई

मूकनायक दौंड ता. प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड – दौंड शहरातील सोशल मीडियावर व्हाट्सअप ग्रुपवर वादग्रस्त व्हिडिओ टाकून धार्मिक तेढ निर्माण होऊल असे कृत्य केल्याने दौंड पोलिसांनी एका व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे दिनांक 04/03/2026 रोजी दौंड येथील इसम जब्बार इस्माईल शेख वय 62 वर्षे राहणार गांधी चौक दौंड जिल्हा पुणे याने त्याच्या मोबाईल मधील व्हाट्सअप ग्रुपवर वादग्रस्त व्हिडिओ टाकून धार्मिक तेढ निर्माण होईल असे केल्याने तात्काळ दौंड पोलीस ठाणे येथे त्यांचा मोबाईल फोन दोन पंचा समक्ष जप्त करून इसम नामे जब्बार इस्माईल शेख यांच्यावर कलम 129 BNSS (108 मादवी ) प्रमाणे कारवाई करून त्यांना विशेष दंडाधिकारी मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो बारामती यांच्याकडे प्रतिबंधक कारवाई करत हजर केले असता विशेष न्यायदंडाधिकारी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी इसम नामे जब्बार ईस्माईल शेख यांची 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्यास येरवडा कारागृहात पुणे येथे रवानगी केली आहे.

तरी दौंड पोलीस स्टेशनहद्दीमधील सर्व नागरिकांना हवन करण्यात येत आहे कीदोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल धार्मिक भावना दुखवतील असे कृत्य मोबाईलव्हाट्सअप वर आक्षेपार्ह टाकल्यास यापुढे संबंधितवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन. दौंड पोलीस चे पोलिस निरीक्षक गोपाळ पावर यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments