Friday, April 17, 2026
Homeनाशिकवणी परीसरात "अवैध" सट्टा - मटका,जुगार व्यवसायाला पोलिस संरक्षणाचा आरोप ? बीट...

वणी परीसरात “अवैध” सट्टा – मटका,जुगार व्यवसायाला पोलिस संरक्षणाचा आरोप ? बीट हवालदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?

मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.

नाशिक जिल्ह्यातील वणी गावात आणि पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर सट्टा-मटका जुगार या प्रकाराने डोके वर काढले असून,त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.गावात विविध ठिकाणी खुलेआम मटक्याच्या अंकांची देवाण घेवाण सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.फोपशी रोड येथे रोड लगत एका राजकिय व्यक्तीचा जुगार अड्डा राजरोस पने सुरू असल्याचे आढळून आले आहे, माळेफाटा,भनवड,पिंपळगाव चींचखेड रोड मार्केट शेजारी वणी पोलिस स्टेशन हद्दीत सर्रास पने मटका सुरू आहे.या सर्व प्रकारामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले असून आदिवासीं ग्रामीण भागातली तरुण पिढीही या “जुगारी” व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता परिसरात महिला वर्गाकडून व्यक्त होत आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार,रोज सकाळ ते संध्याकाळ पर्यंत गावातील व परिसरात विविध ठिकाणी तिन ते चार पिढ्यांच्या मार्फत सट्टा मटका जुगार खेळवला जातो आहे.काहींनी याबाबत पोलीस प्रशासनाकडे तोंडी तक्रार दिल्याचा दावा केला आहे.मात्र अद्याप पर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही,असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.दरम्यान,संबंधित बीट हवालदार यांच्या भूमिकेबाबतही परिसरात प्रश्न उपस्थित होत आहेत ? या अवैद्य सट्टा – मटका जुगार व्यवसायांवर “तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने “छुप्या” रितीने मोठया आर्थिक देवाण घेवानीचा संशय निर्माण झाला आहे,” असे एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.परिसरातील काही वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाने जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परीसरात सट्टा-मटका-जुगार पूर्णपणे बंद करावा,तसेच युवकांमध्ये जनजागृती मोहीम राबवून समोपदेशन करावे,अशी मागणी केली आहे.पोलीस प्रशासनाकडून मात्र या सर्व तोंडी “तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल,” असे ढोबळ पने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments