Thursday, February 26, 2026
Homeनाशिकवणीत शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

वणीत शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

मूकनायक/नाशिक प्रतिनिधी
अमोल भालेराव.

वणी शहर व परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने संपूर्ण शहर भगवेमय झाले असून शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.
शहरातील शिवजन्मोत्सव मंडळ कसबे वणी तसेच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात आली.वणी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठ उभारून आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता.यावेळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. लहान मुलांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेच जगदंबा माता मंदिर चौकातही शिवजन्मोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथे संत तुकाराम महाराज व राजे शिवछत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे दर्शन घडविण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी सहा वाजता जगदंबा माता चौकातून ढोल-ताशा व डीजेच्या तालावर भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमास वणी गावचे सरपंच, उपसरपंच,वणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक,महसुल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी विविध पतसंस्थांचे चेअरमन व पदाधिकारी,शहरातील पत्रकार तसेच महिला व ग्रामस्थ व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments